You are currently viewing मोदींनी अधिवेशन रद्द का केलं याचं उत्तर अगोदर द्या? – उदय सामंत

मोदींनी अधिवेशन रद्द का केलं याचं उत्तर अगोदर द्या? – उदय सामंत

सिंधुदुर्गमधील ओरोस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसात अधिवेशन संपवल्याने ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष भाजपने सडकून टीका केली. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलंय. महाराष्ट्रात आम्ही 2 दिवस अधिवेशन घेऊनही आम्हाला पळपुटे म्हणता, मग अधिवेशनच न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणाल?” असा सवाल उदय सामंत यांनी केला.

 

नारायण राणेंनी केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या टीकेवर उदय सामंत म्हणाले की, “महाराष्ट्रात आम्ही 2 दिवसाचं तरी अधिवेशन घेतलं, मात्र केंद्र सरकारनं काय केलं? शेतकरी आंदोलनामुळे यांना रस्त्यावरून सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे यांना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने जावं लागतंय. ही शेतकऱ्यांनी तयार केलेली परिस्थिती आहे. आम्ही 2 दिवस अधिवेशन घेतलं म्हणून आम्हाला पळपुटे म्हणता, मग मोदींनी अधिवेशन रद्द का केलं याचं उत्तर अगोदर द्या?”

 

“जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय रणनीती असेल हे सांगणार नाही. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे,” असंही सामंत यांनी नमूद केलं.

 

नारायण राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन 2014 पर्यंत चिपी विमानतळ आपण बांधून पूर्ण केल्याचा दावा करत ते सुरू करण्याची जबाबदारी माझीच असल्याचं म्हटलं. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “नारायण राणेंनी केलं तर मग आनंद आहे. या पलीकडे काय बोलू? आनंदचं आहे. मात्र विरोधाला विरोध आपण करणार नाही. मीच केलंय म्हणून सांगणार नाही.”

 

“केंद्राने चिपी संदर्भात कोणतंही आडमूठं धोरण घेतलेलं नाही. ज्या ज्या वेळी केंद्रात चिपी संदर्भात मिंटीग लावली जाते तेव्हा खासदारांचा मान सन्मान ठेवून मिटींग घेतली जाते. त्यामुळे केंद्र सरकारने चिपी विमानतळाविषयी कोणताही नकारात्मक विचार केलेला नाही,” असा दावाही उदय सामंत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा