*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ५५*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आपण दक्ष स्मृति पहात आहोत . काल त्याच्या दुसर्या अध्यायातील एक श्लोक सांगायचा राहून गेला . तो पुढील प्रमाणे —
*यः स्वकर्म परित्यज्य यदन्यत् कुरुते द्विजः ।*
*अज्ञानाद्यदि वा मोहात् स तेन पतितो भवेत् ॥*
जो द्विज अज्ञानाने वा मोहाने आपल्या ( विहित ) कर्मास सोडून कुठलेही अन्य कर्म करतो , तो त्या कर्माने पतित होतो .
आता अज्ञानाबद्दल मला विवेचन करण्याची गरज भासत नाही !! हा शब्द बर्याच टक्के लोकांसाठी माहितगार वा अवगत असावा !! जी माणसे भारतात राहून भारतमाते विरोधी वक्तव्ये वा कृत्ये करत असतात ! त्यांचे तर अंगवळणीच पडला असावा ” अज्ञान ” शब्द !!! असो . दुसरा शब्द येतो “मोह ” . आपल्याजवळ नसणारी गोष्ट तिचे फायदे तोटे जाणल्याशिवाय ती आपल्याजवळ असावी , असे तीव्रतेने वाटून ती पदरात पाडून घेण्याची वृथा कृती करणे व पदरात पाडून घेणे , याला *” मोह “* म्हणतात . आणि तसाच एक शब्द आहे लोभ !! आपल्या उपभोगासाठी जी वस्तू आपल्याजवळ असूनही ती तशीच वा बदल रुपाने आपल्याजवळ मुबलक प्रमाणात असावी असे वाटणे व त्यासाठी धडपडणे वा क्रियाशील असणे वा कुठलेही कृत्य ( सत्य वा असत्य वर्तणूक ) करुन ती पदरात पाडून घेणे , यास *” लोभ “* म्हणावे !! या माझ्या तेजस्वी व ओजस्वी पूर्वजांकडून मला कळलेल्या सोप्या व्याख्या आहेत . कुणाची मते यापेक्षा भिन्न असू शकतात !! आता कर्म . जे आपल्या वाट्याला आलेले आहे ते , जे कुणी आपल्यावर अधिकारी वर्गाने लादले आहे ते वा जे आपण स्वमनाने उचललेले आहे ते , असे कुठलेही कर्म सोडून अज्ञानाने वा मोहाने आपण दुसर्या कर्माकडे आकृष्ट होवून जर ते कर्म करत असू तर आपल्याकडून ते योग्य न झाल्याने आपण निंदेस पात्र होतो , दण्डास पात्र होतो वा स्वतःचे नजरेतूनच उतरणे— हे ही पतित होणेच आहे !! आपल्याकडे भगवान श्रीकृष्णाने एक ओळ सांगून ठेवली आहे गीतेत , *स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।* यात जो स्वधर्म आहे ना ते स्वकर्मच !!! दुसरे काहीच नाही ! हे जाणून कर्म करत रहावे , प्रत्येक माणूस मोठेपणास प्राप्त होईल , यात शंका नाही .
प्रत्येक ऋषिंनी गृहस्थ व गृहस्थाश्रमाविषयी चर्चा करणे , हे गृहस्थाश्रमाचे महत्व आपल्याला सहज समजावते .
आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹