You are currently viewing सिंधुदुर्गात प्रथमच राजकीय नेत्यांकडून दहावीच्या परीक्षार्थीसाठी वाहन व्यवस्था.!

सिंधुदुर्गात प्रथमच राजकीय नेत्यांकडून दहावीच्या परीक्षार्थीसाठी वाहन व्यवस्था.!

*सिंधुदुर्गात प्रथमच राजकीय नेत्यांकडून दहावीच्या परीक्षार्थीसाठी वाहन व्यवस्था.!*

*अर्चना फाउंडेशनच्या अर्चना घारे समाजकार्यात दोन पाऊले पुढे*

महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवत्तेत कुठेच कमी पडत नाही परंतु कमी पडतो तो म्हणजे शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत. जिल्ह्यातील अनेक मुले ही खेडोपाड्यातून आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार एस टी, रिक्षा, मोटरसायकल आदी वाहनांच्या मदतीने शहरातील परीक्षा केंद्रांवर पोचतात. बऱ्याचदा एस.टी.च्या वेळा जुळत नसल्याने पेपरच्या वेळेच्या आधीच शाळा गाठाव्या लागतात, परिणामी मुलांना अभ्यास करणे अवघड होते आणि द्विधा मनस्थितीत पेपर सोडविणे म्हणजे दहावीच्या मुलांसाठी तारेवरची कसरत असते. जाता येताना बराच वेळ प्रवासात वाया जातो आणि गाडी चुकली तर..? अशी शंकेची टांगती तलवार डोक्यावर असतेच. या कसरतीमुळे गावपातळीवरची मुले ऐन परीक्षेत मागे पडतात. ना सरकार त्यांची दखल घेत ना कोणी देवमाणूस त्यांच्यासाठी देवदूत बनून उभा राहत. त्यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होते.
आजपर्यंत कोणीही गावागावांतील दहावीच्या मुलांना होणाऱ्या या त्रासाचा साधा विचार केला नव्हता किंवा कोणाला मुलांच्या भवितव्याची चिंता वाटली होती. सत्ता सर्व राजकारणी भोगतात, मतांचा जोगवा मागताना अनेक आश्वासने देतात परंतु निवडून आल्यावर क्षुल्लक गोष्टी ज्याची जनतेला आवश्यकता असते त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करतात. सावंतवाडीत पहिल्यांदाच कुणी राजकीय व्यक्तीने सत्ता नसताना देखील खेड्यापाड्यातील शाळकरी मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोचता यावे यासाठी मुलांचा विचार केला आणि शालांत परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. विद्यार्थ्यांना ने -आण करण्यासाठी अर्चना घारे यांनी चांगल्या प्रकारे वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली असून या स्तुत्य उपक्रमास अनेकांनी दाद दिली असून अर्चना घारे यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल अनेकांनी त्यांचे आभार मानले परंतु ज्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेत प्रवासासाठी वाहनाची आवश्यकता होती ते मात्र अर्चना घारे यांचे उपकार कायम स्मरणात ठेवतील.
सावंतवाडी तालुक्यातील विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस, आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल, येथे स्वतः अर्चना घारे – परब यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. केवळ सावंतवाडी तालुकाच नव्हे तर दोडामार्ग व वेंगुर्ला या तीनही तालुक्यातील विविध शाळांमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यात माध्यमिक विद्यालय सोनावल, श्री नवदुर्ग माध्यमिक विद्यालय आयी, श्री.शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे, माध्यमिक विद्यालय मांगेली या दोडामार्ग तालुक्यातील शाळांमध्ये तसेच वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली, डॉ. रा. धो. खानोलकर हायस्कूल मठ, अणसुर पाल हायस्कूल, श्री.शिवाजी हायस्कूल तुळस, न्यू इंग्लिश स्कूल मातोंड या शाळांतील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. सावंतवाडी तालुक्यातील रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे, न्यू इंग्लिश स्कूल चौकुळ, माध्यमिक विद्यालय माडखोल, पावणाई विद्यामंदिर शिरशिंगे, कै.बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोली, श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये, न्यू इंग्लिश स्कूल कलंबिस्त, या शाळांमध्ये देखील अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करून देण्यात आली आहे.
कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आहे. मात्र अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या पालकांना शिक्षणासाठी आर्थिक भार सोसणे शक्य होत नाही. याचे सामाजिक भान ठेवत अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था तीनही तालुक्यात करून देण्यात आली. त्याचबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी पेन बक्षीस देत परीक्षेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या. खरंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणमंत्री पदाचा कारभार हाकत असताना निदान आपल्या मतदारसंघात अशाप्रकारे शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविणे आवश्यक होते. परंतु राज्यातील राजकीय घडामोडी आणि सत्ताकारणात होणारे बदल यात गुरफटल्याने दीपक भाईंचा गावातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. भाईंनी कार्यकर्ते, पदाधिकारी आदी जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसाठी कामाला लावले परंतु अर्चना घारेंनी संधीचा फायदा घेत गावागावात पोचल्या, लोकांच्या सुखदुःखात समरस झाल्या. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या हृदयात जागा करण्यास सुरुवात केली म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी भागात येतो, त्यामुळे जिल्ह्यातील विखुरलेल्या खेड्यांमध्ये दिवसाला एक दोन एस टी गाड्या जातात, काही गावांमध्ये आजही एस टी सेवा उपलब्ध नाही. अशावेळी मुलांना परीक्षेसाठी वेळेत परीक्षा केंद्र गाठणे आवश्यक असते. अर्चना घारे यांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून सामाजिक भान राखत घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद..!

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा