You are currently viewing प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्ति वंदन मेळावा  मोठ्या उत्साहात  संपन्न.

प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्ति वंदन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्ति वंदन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

कुडाळ

दिनांक १मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सन्माननीय सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत *शक्ति वंदन* मेळावा संपन्न झाला याप्रसंगी सोबत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत, कुडाळ मालवण प्रभारी श्री.निलेशजी राणे साहेब, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर, सावंतवाडी विधानसभा प्रभारी श्री.राजन तेली,जिल्हा संयोजक शक्ति वंदन श्री.प्रसन्ना देसाई ,प्रदेश सरचिटणीस महिला मोर्चा मंजुषा कुद्रीमोती,उपाध्यक्षा सौ.प्रज्ञा ढवण,जिल्हा समन्वयक सौ.आम्रपाली साळवी,सौ. अर्चना देसाई ,प्रदेश सदस्य सौ.संध्या तेरसे,सौ.रश्मी लुडबे ,सौ.दिप्ती पडते तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी,सर्व मंडल अध्यक्षा, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सिंधुदुर्गातील सामाजिक, औद्योगिक संस्था तसेच महिलांसाठी विशेष काम करणाऱ्या महिलांचा *शक्ति संगिनी* पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या.चित्राताई वाघ यांनी सिंधुदुर्गच नाही तर कोकण भागातील संस्कृतीचं भरभरुन कौतुक केलं. कोकणात होत असलेलं मुलीच्या जन्माचे स्वागत असो, स्वाभिमानी कोकणी शेतकऱ्याच्या मनातील गोडवा असो,कणखर- मेहनती कोकणी स्री असो सर्वांच मनापासून कौतुक केलं. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग भाजपा टीमचंही कौतुक ताईंनी आपल्या भाषणातून केलं.माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांच्या कामाचा ही आवर्जून उल्लेख केला आणि त्यांच्याकडून पुढे आलेली धुरा समर्थपणे पेलणार्या विद्यमान जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत व महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर यांचंही काम छान सुरु असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी महिलांसाठी आणलेल्या सर्व योजना जसं की,मातृवंदना,इज्जत घर,उज्वला गॅस, आयुष्यमान भारत,स्वनिधी कर्ज योजना ,लखपती दिदी या योजनांवर सविस्तरपणे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तुम्ही सर्व माता-भगिनींनी मला निवडून देऊन देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद दिले आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आज तुमच्या जिल्ह्यात आल्याचं ताईंनी सांगितलं.
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लर्निंग लिंक फाउंडेशन च्या माध्यमातून झालेल्या महिला सशक्तकरण कार्यक्रम,जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून झालेल्या ई-कॉमर्स कार्यशाळा तसेच केंद्रीय मंत्री या.नारायणराव राणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या ग्रामोद्योग विकास योजना यासर्व उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.
महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर यांनी जिल्ह्यातील महिलांच्या कामाचा आढावा दिला.तसेच सर्व महिलांच्या वतीने पंतप्रधान मोदीजींनी धन्यवाद देत असताना येणार्या २०२४ लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग -रत्नागिरीमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून देत मोदीजींना अपेक्षित ४००+ बहुमत शंभर टक्के मिळणार अश्या शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या वतीने दिल्या.
शक्ति वंदना जिल्हा संयोजक श्री प्रसन्ना देसाई यांचाही सत्कार या.चित्राताई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बांदा मंडल अध्यक्षा सौ.रुपाली शिरसाट यांनी केले व आभार प्रदर्शन कुडाळ मंडल अध्यक्षा सौ.आरती पाटील यांनी केले.

शक्ति संगिनी पुरस्कार प्रदान पुढील प्रमाणे करण्यात आले-
1) सौ.मेघा अजय गांगण
कनकदुर्गा महिला औद्योगिक संस्था – कणकवली

2) सौ.प्रज्ञा प्रदिप ढवण
महालक्ष्मी महिला औद्योगिक संस्था – कणकवली

3)सौ. पूजा प्रसाद सरकारे
अध्यक्ष, मालवण बंदर जेटी स्टॉलधारक संघटना,
मालवण.

४) स्नेहल संजय बांदिवडेकर
अध्यक्ष सातेरी महिला विविध सहकारी संस्था मर्यादित
निरवडे

५) सौ.सुजाता संदीप देसाई
सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था असोली वेंगुर्ला
६) सौ.संध्या प्रसाद तेरसे
अध्यक्ष नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळ

७)सौ.प्राची तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रोन दिदी

८)श्रीमती दिप्ती श्रीराम मोरे
महिला समन्वयक -प्रशिक्षक

९)सौ.हर्शदा वाळके
यशदा प्रशिक्षिका

१०)सौ.आरती पाटील
यशदा प्रशिक्षिका

११) सौ.सुवर्णलता धारगळकर
महिला बहुउद्देशीय संस्था

१२)श्रीमती प्रेमा जाधव
स्वच्छता दुत,परुळे वेंगुर्ले

१३) वैष्णवी विष्णुमोंडकर
अध्यक्षा मातृत्व वरदान फाउंडेशन
मालवण

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा