आंगणेवाडी यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज…
विविध आगारातून १६७ बसेसची व्यवस्था; प्रवासी उपलब्धतेनुसार जादा सुटणार…
सिंधुदुर्ग
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून एसटीच्या १६७ बस सोडण्यात येणार आहेत. तर सर्व बसस्थानकात पुरेसे प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर दिवसरात्र बसेस आंगणेवाडीसाठी रवाना होणार आहेत.
अांगणेवाडीची यात्रा उद्या २ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी आज दुपारपासूनच बसेस सोडल्या जात असल्याची माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली. तर प्रवाशांचे भारमान पाहून कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आदी रेल्वे रेल्वे स्टेशन पासून तेथील एसटी आगारापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
एस.टी. विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुडाळ बसस्थानक ते आंगणेवाडी मंदिर या मार्गावर ४३ गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या कुडाळ ते कसाल तेथून हिवाळेमार्गे आंगणेवाडी अशा धावणार आहेत. त्याचबरोबर कसाल, खोटले ते आंगणेवाडी, कुडाळ ते निरूखे तेथून पांग्रड ते आंगणेवाडी तसेच कुडाळ ते पणदूर ते ओरोस ते आंगणेवाडी अशा मार्गावर बसेस धावणार आहेत.
मालवण तालुक्यातील मालवण बस आगार ते आंगणेवाडी पर्यंतच्या प्रवासासाठी ६४ बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी, मसुरे ते आंगणेवाडी चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी, देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी, वराड ते आंगणेवाडी, तळगाव, सुकळवाड ते आंगणेवाडी, तिरवडे, मसुरे ते आंगणेवाडी, कट्टा, कुणकुवण ते आंगणेवाडी, धामापूर ते आंगणेवाडी अशा मार्गावर या बसेस धावणार आहेत.
कणकवली आगारातून आंगणेवाडी साठी ३१ बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस अजगणी, असरोंडी मार्गे आंगणेवाडी अशा धावणार आहेत.
देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी मार्गावर २२ बसेस धावणार आहेत. देवगड आचरा ते आंगणेवाडी, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी, तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी, कुडोपी ते आंगणेवाडी, आरे, निरोम ते आंगणेवाडी, आचरा, चिंदर, त्रिंबक ते आंगणेवाडी अशा बसेस धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले ते आंगणेवाडी २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
भराडी देवीच्या यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे. एसटीच्या या सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*