सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज आणि तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथे वटसावित्री सभागृहात श्री संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी भाजी मंडई येथे साफसफाई करण्यात आली. त्यानंतर श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी परीट समाजाच्या झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले की, सर्व समाज बांधवांनी एकसंघ रहाणे फार आवश्यक असून, श्री संत गाडगेबाबा महाराज यांचे विचार जनमानसात पोहोचवणे फार गरजेचे आहे. तरच त्यांची पुण्यतिथी आपण साजरी केल्याचे सार्थक होईल. यावेळी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे स्वच्छतादुत दिपक म्हापसेकर यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, ज्येष्ठ सल्लागार देवेंद्र होडावडेकर, मधुकर मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यानंतर दुपारी झुणका भाकर असा प्रसाद उपस्थितांना वाटण्यात आला आहे. यानंतर दुपारी कुटीर रुग्णालय व जानकीबाई सूतिकागृह येथे फळे व प्रसाद यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कोव्हिड चे सर्व नियम पाळून अतिशय साध्या पद्धतीत ही जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, दयानंद रेडकर, प्रदीप भालेकर, देवेंद्र होडावडेकर, सुरेंद्र कासकर, चव्हाण, लक्ष्मण बांदेकर, भगवान वाडकर, शेखर होडावडेकर, सुरेश पन्हाळकर, मनोहर रेडकर, रामकृष्ण रेडकर, महेश तळवणेकर आदी उपस्थित होते.