You are currently viewing पडवे-माजगाव येथील अग्निहोत्र कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पडवे-माजगाव येथील अग्निहोत्र कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पडवे-माजगाव येथील अग्निहोत्र कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा

पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने पडवे माजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. सध्या पडवे माजगाव येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर चालू आहे. शंख प्रक्षालन, त्राटक, जलनिती, सूत्रनिती, नस्यनीती, नेत्रनिती, वमन क्रिया, ॲक्युप्रेशर, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम यासारख्या अनेक उपयुक्त अशा योगक्रियांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळत आहे.

या योगाभ्यासातील महत्वाचा घटक असलेला अग्निहोत्र प्रशिक्षण हा कार्यक्रम योग वर्गात घेण्यात आला. त्यावेळी प्रज्वलित केलेली हवनकुंडे आणि मंत्रोच्चारामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न झाले होते.

या शिबिरामध्ये पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या मार्फत सर्व शिबिरार्थ्यांना होमहवन प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी संतोष मोरे, भिकाजी गवस, सुशांत देसाई, सचिन देसाई, लक्ष्मण पावसकर, मयुरेश गवंडळकर, विठ्ठल देसाई, मयुरी देसाई , सेजल गवस, प्रियांका सावंत, दिपाली गवस, शुभांगी देसाई, निकिता देसाई, निर्मला देसाई, विशाखा गवस, उज्वला देसाई यांनी होमहवन प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा