अखेर उ.बा.ठा शिवसेना महिला आघाडीच्या आमरण उपोषणाला यश..
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ डॉ.भक्ती सावंत यांची तात्काळ स्वरूपात नियुक्ती.
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र जोडण्यात आलेल्या दोडामार्ग तालुका रुग्णालयात गेल्या वर्षापासून स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नसल्याने गरोदर महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. महिला रुग्णांना प्रसुतीसाठी गोवा येथे पाठवले जात आहे. यामुळे नातेवाईक यांची फरफट होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय इतर आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, ही गैरसोय लक्षात घेऊन तसेच वारंवार स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची मागणी करून देखील सरकार या मागणी कडे लक्ष देत नव्हते.त्यामुळे संतापलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय आवारात काल दि २६ फेब्रुवारी पासुन आमरण उपोषण सुरूवात केली होती.
त्यांच्या या आमरण उपोषणाला यश आले असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस एच पाटील यांनी पुढील आदेश येई पर्यंत स्त्री रोग तज्ञ डॉ. भक्ती सावंत यांची तात्काळ स्वरूपात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अश्या लेखी पत्रानंतर उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी,महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, विभागप्रमुख जेनिफर लोबो, लोबो, उप विभागप्रमुख रेश्मा नयनी शेटकर, सपना नाईक, शिलाल फर्नाडीस, सुषमा सावंत, शीतल सावंत, जान्हवी तळणकर, कल्पिता सावंत, मौथली सावंत, प्रिया नाईक, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका- प्रमुख संजय गवस, युवासेना प्रमुख मदन राणे, सोशल मीडिया ता तालुका प्रमुख संदेश राणे,नगरसेवक चंदन गावकर, यांसह लक्ष्मण आयनोडकर, शिवराम मोर्लेकर, मिलिंद नाईक, इस्माईल चांद, सचिन केसरकर विष्णू मुंज, संदेश वरक, राजू गावडे, दशरथ मोरजकर,आदी उपस्थित होते.