कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात ४ ते ८ मार्च रोजी दरवर्षी प्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सोमवार ४ मार्च २०२४ सकाळी – ८ वा. महारुद्र प्रारंभ, दुपारी – १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी – ३ ते ७ वा. खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा नाट्यप्रयोग (कू. कामाक्षी नवीन नेरूरकर, मडगाव गोवा यांच्या सौजन्याने ), रात्रौ – ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक ( गायक – दिनू मेस्त्री ), रात्रौ – १० वा. कीर्तन ह. भ. प. श्री. उपाध्ये बुवा, तर मंगळवार ५ मार्च २०२४ सकाळी – ८ वा. महारुद्र – श्री. देव गावडोबा, श्री. देव रवळनाथ, श्री. देव भूतनाथ अभिषेक पूजन श्री. देवी सातेरी कडे कुंकु मार्चन व सप्तशती पाठ, दुपारी – १ ते ३ वा. महाप्रसाद,
दुपारी ३ ते ७ वा.आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा नाट्यप्रयोग, रात्रौ. ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक – दिनू मेस्त्री), रात्रौ. १० वा. कीर्तन – ह. भ. प. उपाध्ये बुवा, बुधवार ६ मार्च २०२४ सकाळी – ८ वा. महारुद्र समाप्ती, दुपारी – १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी – ३ ते ७ वा. ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग, रात्रौ. ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक – दिनू मेस्त्री), रात्रौ. १० वा. कीर्तन – ह. भ. प. उपाध्ये बुवा, गुरुवार ७ मार्च २०२४
सकाळी ८ वा. परिवार देवतांवर अभिषेक पूजन, दुपारी १ वा. वरदशंकर पूजा, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ७ वा. श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा नाट्यप्रयोग ( कै. सुधीर कलिंगण), रात्रौ. ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक ( गायक – दिनू मेस्त्री), रात्रौ. १० वा.कीर्तन – ह. भ. प. उपाध्ये बुवा, शुक्रवार ८ मार्च २०२४ सकाळी – ५ वा. धार्मिक विधी व श्रींचे दर्शन, सकाळी ९ ते १ वा. स्थानिक मंडळांची भजने, सायं – ४ वा. कीर्तन – ह. भ. प. उपाध्ये बुवा, सायं. ६ ते ७ वा. सत्संग भजन – आदित्य साऊळ आणि अंकिता साउळ, रात्रौ. १० वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक – दिनू मेस्त्री), रात्रौ. १२ वा. दशावतारी गणपती दर्शन, श्रींचे रथापर्यंत वाजत गाजत आगमन, रात्रौ. १२:३० वा. आकर्षक विद्युत रोषणाईसह श्री. श्रींची रथातून मिरवणूक – दशावतारी नाटकाचा उर्वरित भाग – श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर ( कै. बाबी कलींगण). शनिवार ९ मार्च २०२४ सायं – ५ वा. कीर्तन – ह. भ. प. उपाध्ये बुवा. सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ ते गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ पर्यंत रोज दुपारी १ ते ३ वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, श्री. देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूर यांनी केले आहे.