बनावट दस्तावेज करून जमीन विक्री प्रकरणी २० लाखांना गंडा घातले प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल : एक ताब्यात
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील एका जमीनीचे बनावट दस्तावेज तयार करून आपलीच जमीन आहे असे भासवून जमीन विक्री प्रकरणात तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकार हा मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या मुदतीत घडला होता. या विरोधात ज्ञानेश्वर गवळी ( रा.आंबेगाव) यांनी सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी अक्षय आनंद सावंत ( रा.कुंब्रल ) व अरुण डॅनी मिरांडा यांसह इतर चार मिळून एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील एकाला सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू होती. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील जमीन विक्री प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे आणि मालक असल्याचे भासवून २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात रविवारी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अक्षय सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यानी दिली.
या प्रकरणी अक्षय सावंत, अरुण मिरांडा व अन्य चार जण अशा सहा जणाविरोधात भादवि कलम ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ (३४) अन्वये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीसात दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये संशयित आरोपी १ ते ६ यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर गवळी यांना केसरी येथील जमीन खरेदी बाबत खोटे दस्तऐवज व जमिनीचे मालक असल्याचे सांगणारे खोटे मालक तयार करून २० लाखांची फसवणूक केली अशी फिर्याद ज्ञानेश्वर गवळी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
त्यानुसार संशयित अक्षय आनंद सावंत, अरूण मिरांडा व एतर चार अशासहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीसानी सखोल केल्यास आणखी फसवणूकीत प्रकार उघड होणार आहे असे तपासी अधिकारी सहाय्यक पालीस निरीक्षक श्रीकांत इंगवले म्हणाले. या प्रकरणामध्ये आम्ही जलद गतीने तपास करून अक्षय सावंत याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी करून इतर पाच जणांची माहिती घेऊन त्याना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.