*ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक, कवी बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संत सुधारक*
स्वच्छतेचे अग्रदूत, हाती झाडू, मडके धरून
बिंबविले जनी करून प्रबोधन किर्तन
अंधश्रद्धा, अस्वच्छता, अज्ञानाचे उच्चाटन
लोकोत्तर कर्तृत्वाचा असा संत होणे नाही
-१-
दांभिकपणा रूढी नि परंपरांना छेदून
समाजसुधारकी वैज्ञानिक तो दृष्टिकोन
सामाजिक न्यायासाठीच झटले आजीवन
युगेयुगे नवद्रष्टा असा संत होणे नाही
-२-
निराशितांना दिली हिंमत सर्वच समान
दुबळे, अनाथ, अपंग, दीनांची सेवा मग्न
गोधडे महाराज म्हणून ही नामाभिधान
जगन्मान्य महाराष्ट्री असा संत होणे नाही
-३-
आयुष्यभर घेतला वसा स्व वर्तनातून
सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन
धर्मशाळा,अनाथालये,विद्यालये स्थापून
भ्रमंती गावोगावी ती असा संत होणे नाही
-४-
चोरी करू नका, सावकारी कर्ज काढू नका
रहा साधे, नकाच करू कोणतेही व्यसन
देवा-धर्माच्या नावे प्राण्यांची हत्या करू नका
जातिभेद ,अस्पृश्यता पाळू नका गेले सांगून
-५-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर२१ स्कीम१०
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
मो. 9890567468