सावंतवाडी :
नामदार माननीय दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ या संस्थेच्या वतीने १० साहित्यकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला फार मोठी साहित्यिक परंपरा आहे. आजही अनेक नवोदित साहित्य ती परंपरा पुढे चालवीत आहे. मराठी भाषेचे अध्यापक म्हणून तसेच भाषेचे अखंड व भाषा संवर्धनाची कार्य ज्यांच्या हातून घडले आहे. अशा नव्या जुन्या साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दहा साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सौ वृंदा कांबळी (कुडाळ), प्रभाकर भागवत (सावंतवाडी), रामचंद्र शिरोडकर (तळकट), मोतीराम टोपले (माजगाव), दीपक पटेकर (सावंतवाडी), बाळकृष्ण राणे (सावंतवाडी), कु. स्वप्ना गोवेकर (सावंतवाडी), भास्कर पावस्कर (बांदा) श्री हरिश्चंद्र भिसे (कळणे) स्नेहा कदम (सावंतवाडी) यांच्या गौरव मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वि.ना. लांडगे (सातारा), श्री. रमेश पिंगुळकर (वेंगुर्ला), राजन पोकळे (सावंतवाडी), सौ. कल्पना बोडके (सावंतवाडी) प्राचार्य यशोधन गवस उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रंथ भेट देऊन हा सन्मान करण्यात येईल. मराठी साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष भरत गावडे व दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.