श्री पंचम खेमराज महाविद्यालया (स्वायत्त )मध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्ताने कवयत्री लेखिका अनघा तांबोळी यांचे
काव्यवाचन व गायन होणार…
सावंतवाडी
श्री पंचम महाविद्यालया मध्ये ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्ताने आघाडीच्या कवयत्री अनघा तांबोळी यांचे काव्यवाचन व गायन होणार आहे. अनघा या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असून या संवेदनशील मनाच्या, शब्दावर प्रभुत्व असलेल्या, कवयत्री असून, त्यांनी कविता लेखन, कथालेखन, नाटिका, ललित लेखन, प्रवास वर्णन, विविध नियतकालिकातून लेखन, विविध आकाशवाणी कार्यक्रमात सहभाग, विविध संमेलन मध्ये आमंत्रित, तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी याकरिता त्या कथाकथन आणि काव्य वाचनाचा उपक्रम घेत आहेत. त्यांचे लिखाण नेहमी वर्तमानपत्र व दिवाळी अंक नियतकालिकातून प्रकाशित होत असते. दूरदर्शन व रेडिओवरून त्यांचे कवितांचे आणि गाण्यांचे कार्यक्रम नेहमी होतात. निरनिराळ्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना विशेष निमंत्रित कवयत्री म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. ‘ केवलप्रयोगी’ हा त्यांचा गाण्यावर आणि कविता वर आधारित कार्यक्रम महाराष्ट्रभरातुन वेगवेगळ्या शहरांमध्ये सादर होत असतो. त्यांचे आजवर 50 हुन प्रयोग झालेले आहेत. त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दिनांक 27/2/2024 रोजी सकाळी नऊ वा.9.00 अनघा तांबोळी यांचा काव्यवाचन व काव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना संगीत साथ, संजय किल्लेदार करणार आहेत. किल्लेदार हे
गीतकार, संगीतकार, गायक, पटकथा, लेखक असून त्यांनी 4 मराठी चित्रपटास संगीत, तीन मालिकांचे संगीत, 2000
जाहिराती (जिंगल) व 2500 स्टेज शो केलेले आहेत. करिता या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. डी. एल भारमल यांनी आवाहन केले आहे.