You are currently viewing पोलीस दलाकडून जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी 23 ते 29 फेब्रुवारी रोजी जनजागृती अभियानाचे आयोजन

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी 23 ते 29 फेब्रुवारी रोजी जनजागृती अभियानाचे आयोजन

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी 23 ते 29 फेब्रुवारी रोजी जनजागृती अभियानाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी दि. 23 ते 29 फेब्रुवारी रोजी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरकुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरीक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरीक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने ते ज्येष्ठ नागरीक दांपत्य त्यांचे मूळ परी असतात अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक होताना दिसून येत आहे. काही ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्याची माहिती नसल्याने ते कोणत्यातरी अनधिकृत मान्टी लेव्हल चैन मार्केटींगच्या कंपनीमध्ये किंवा कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. परंतु त्यांची आर्थिक फसवणूक झालेली दिसून येते.

ज्येष्ठ नागरीकांची सायबर व आर्थिक फसवणूक होऊ नये, तसेच त्यांनी सोशल मिडीया वापरताना घ्यावयाची काळजी, बैंक व पोस्टची अकाऊंट, ATM कार्ड, क्रेडीट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलआयसी, पीपीएफ इ. बाबतची माहिती गैरव्यक्ती पर्यंत पोहचू नये, आर्थिक सक्षम ज्येष्ठ नागरीकांनी आपले घरास CCTV कैमेरे, सुरक्षित कंपाऊंड इ. उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करणे, अनोळखी तसेच परप्रांतिय व्यक्ती यांच्यांशी संपर्कात आल्यानंतर घ्यावयाची दक्षता, शासनाच्या ज्येष्ठ नागरीकांशी संबंधित योजनांची माहिती, फिरस्त्या व्यक्तींकडून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, घरातील मौल्यवान वस्तु, दागिणे, पैसे इ. ठेवताना घ्यावयाची दक्षता इत्यांदी विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन कराण्यासाठी दि. 23/02/2024 ते दि. 29/02/2024  या कालावधीत ज्येष्ठ नागरीक जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त ज्येष्ठ नागरीकांची फौजदारी प्रकरणांची प्राधान्याने निर्गती करणे, पंचायत समिती, तहसिलदार कार्यालय, नगरपालिका, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ज्येष्ठ नागरीकांचे आसपास राहणारे स्वयंसेवक, सामाजिक संस्था, वृद्धाश्रम यांच्याशी योग्य समन्वय ठेवून शहर व गावनिहाय प्रत्येक ज्येष्ठ नागरीकांपर्यंत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस दुरक्षेत्र अंमलदार पोहचून ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याच्या तसेच, पोलीस दलाची तात्काळ, तत्पर मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन नं. 112 बाबत माहिती तसेच सर्व पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

या अभियानामध्ये जिल्हा, तालुका व गाव स्तरांवरील सर्व प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, बँकांचे मॅनेजर, पोस्ट ऑफिसर, ज्येष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या संस्था, सर्व विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटना, स्वयंसेवक, पोलीस पाटील, पत्रकार यांनी सहभागी होवून अभियानाचा उद्देश सफल करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात येत आहे.    

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा