*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“प.पू.श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जन्मदिना निमित्त वंदन!”*
!! श्रीराम !!
गणूचा ही जन्म झाला जग आनंदले
रावजी गीताईंना पुत्ररत्न झाले IIधृII
प्रसूती वेळ जवळ आली नऊ मास पूर्ण झाले
सोहळे सर्वही शास्त्र रुढी परी केले
प्रसुती वार्ता ऐकण्या सर्व आतुरलेII1II
सतराशे सहासष्टांत माघ शुद्ध द्वादशी
बुध घटी प्रभात मीन लग्नी रवी आले
होऊनी चमत्कार नामयोगी जन्मलेII2II
रावजी करीत होते राम नाम गजर
पुत्र मुख पाहण्या झाले अधीर
आनंदे वाटली घरोघरी साखरII3II
वेदमूर्ती पाचारीले दान करून संतोषीले
रावजिंनी कुणा वस्त्रे कुणा अन्नदान केले
भविष्यवाणी सार्थ ठरली परब्रह्म अवतरलेII4II
पूर्व पुण्य सुपुत्र सिद्ध पुरुष लाधले
त्रयोदशी दिनी *”गणेश”* नाम ठेविले
श्रीरामदास भूवरी अवतरलेII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.