You are currently viewing उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला गाईडना ड्रेसकोडचे वाटप

उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला गाईडना ड्रेसकोडचे वाटप

मालवण

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईडना ड्रेसकोड म्हणून टी शर्ट आणि कॅपचे वाटप तेथील उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांनी केले आहे. यावेळी किल्ला वाहतूक होडी व्यवसायिकांना देखील मोफत मास्क उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सागर वाडकर आणि मंदार केणी यांनी यापूर्वी मालवणात ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयात पीपीई किट आणि मास्क वाटप केले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा विचार करून किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेला मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर गाईड सेवा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींना सागर वाडकर आणि मंदार केणी यांनी टी शर्ट आणि कॅप उपलब्ध करून दिले आहेत. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडी वाहतूक करणाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी सागर वाडकर, मंदार केणी यांच्यासह संतोष कुराडे, प्रदीप उगले, बाबू वाघ, नामदेव पोटले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा