You are currently viewing कौटुंबिक हिंसाचार विषयावर कार्यशाळा

कौटुंबिक हिंसाचार विषयावर कार्यशाळा

कौटुंबिक हिंसाचार विषयावर कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम,२००५ व नियम,२००६ अंतर्गत कार्यरत संरक्षण अधिकारी व सर्व स्टेकहोल्डर्स (पोलीस /वैद्यकीय अधिकारी/स्वयंसेवी संस्था/विधी सेवा प्राधिकरण) यांची एकदिवसीय कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय  ओरोस येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, ज्येष्ठ विधीज्ञ अजित भणगे, आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,विधी सेवा प्राधिकरण वकील, सेवा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्था,समुपदेशन केंद्रे,कौटुंबिक सल्ला केंद्रे, कनिष्ठ संरक्षण अधिकारी वन स्टॉप सेंटर यांचा सहभाग होता. प्रथम सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अजित भणगे  यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम,२००५ अनुषंगाने कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींविषयी  तसेच केस दाखल करताना लक्षात ठेवायचे मुद्दे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या रिटेनर लॉयर अॅड. मनीषा नरे यांनी DV ACT व विधी सेवा प्राधिकरणची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या विधी सल्लागार श्रीम.श्रीनिधी देशपांडे  यांनी कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांसाठी उपलब्ध असणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या योजना याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात अॅड.सुहास सावंत (ज्येष्ठ विधीज्ञ) यांनी DV ACT व पोलीस/वकील/वैद्यकीय अधिकारी/स्वयंसेवी संस्था यांची भूमिका  याबाबत मार्गदर्शन केले.  शेवटच्या तासात चर्चासत्र कार्यक्रमात श्रीम.अनिता कुरणे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी DV ACT संदर्भातील उपस्थितांचे प्रश्नांचे शंका-समाधान केले. तसेच यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून स्टेकहोल्डर्स यांना कार्यालयाचे ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी पोस्टरचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात सोमनाथ रसाळ म्हणाले, सर्व स्टेकहोल्डर्स यांनी जास्तीत जास्त कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांना न्याय मिळवून देणे साठी प्रयत्न करावेत, असे आवाहन  केले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.भोसले यांनी कायद्याच्या नवनवीन तरतुदींबाबत अद्यावत ज्ञान घेण्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षणे आवश्यक असल्याचे सांगितले.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://www.facebook.com/share/p/aHUypmmwKiMeH3eA/?mibextid=oFDknk

https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा