कोकणाचा विकास हेच मानव साधन विकास संस्थेचे ध्येय – उमा प्रभू
मच्छीमार युवकांना वॉटर स्पोर्ट परवाने वितरित
सिंधुदुर्गनगरी
कोकणातील सामाजिक व आर्थिक शाश्वत विकास हेच मानव साधन विकास संस्थेचे ध्येय आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी केले. मानव विकास संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प सिंधूपुत्र अंतर्गत मच्छीमार युवकांना वॉटर स्पोर्ट परवाने वितरित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिंगत होणारे पर्यटन मूल्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित, परिवर्तन केंद्र-सिंधुदूर्ग आणि आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प सिंधुपुत्र हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत लाईफ सेव्हिंग टेक्निक्स्-वाॅटर स्पोर्टस्’ व पाॅवर बोट हॅन्डलिंग (टिलर) चे निवडक ८७ मच्छिमार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
यात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १० सिंधुकन्यांनी प्रथमच आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून भारतातील नामांकित भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रबंध संस्थान अंतर्गत राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा या पर्यटन मंत्रालय भारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले होते.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवगड हे तालुके वाॅटरस्पोर्टस् व्यवसायासाठी पोषक आहेत. सहकारातून या क्षेत्रात रोजगार निर्मिती सहज शक्य आहे. यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व वाॅटर स्पोर्टस परवाना वितरणाचा सोहळा आरवली-सागरतिर्थ येथील आराकिला या पंचतारांकित रिसाॅर्ट वर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आय.सी.आय.सी.आय.चे प्रेसिडेंट संजय गुप्ता, फोमेंटो ग्रुपचे अवधुत तिमलो, सी.आय.आय.चे डाॅ. राजेश कपुर, लुपिन लिमिटेडचे सिताराम गुप्ता, संस्थेचे विश्वस्त अदिती सावंत, नाबार्डच्या रश्मी दरड, राष्ट्रीय जलक्रीडा संस्थानचे डाॅ. रविंद्र डोग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*