You are currently viewing सावंतवाडीमध्ये आता अस्सल कोल्हापुरी मटण आणि मिसळची चव…!

सावंतवाडीमध्ये आता अस्सल कोल्हापुरी मटण आणि मिसळची चव…!

“सयाजी रेस्टॉरंट”चे उद्या उद्घाटन; तांबडा-पांढर्‍या रश्यासोबतच अन्य थाळींची पर्वणी…

सावंतवाडी
अस्सल कोल्हापुरी पदार्थांची चव चाखणार्‍या खव्वयांना आता कोल्हापुरात जाण्याची गरज नाही. कारण कोल्हापुरचे चमचमीत चिकन-मटण जेवण आता सावंतवाडीत सुद्धा मिळणार आहे. “सयाजी रेस्ट्रो” फॅमिली रेस्टॉरंटच्या माध्यमातून आता अस्सल कोल्हापुरी जेवण देण्याचा मानस सावंतवाडी येथील उद्योजक उदय पारळे यांनी व्यक्त केला आहे.
उद्या २० डिसेंबर पासून हे रेस्टॉरंट ग्राहकासाठी खूले होणार आहे. येथील गांधी चौक परीसरात दतात्रय निवास या इमारतीत हे आलीशान हॉटेल उभारण्यात आले आहे. त्यात मटण, चिकन जेवणाबरोबर व्हेज-नॉन तांबडा-पांढरा रस्सा तसेच इतर कोल्हापुरी पदार्थ मिळणार आहेत. त्याच बरोबर कोल्हापूरी अंडाकरी आणि स्पेशल मिसळ थाळीची चव सुद्धा याठिकाणी चाखायला मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा