*स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी पुरस्कारांची घोषणा*
पिंपरी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी हे पुरस्कार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनीलजी देवधर यांच्या हस्ते आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६:३० वाजता प्रदान केले जातील. या पुरस्कारांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार हा शुभान फाउंडेशन, मिझोराम आणि राज्यस्तरीय पुरस्कार स्वयंसिद्धा, कोल्हापूर या संस्थांना घोषित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणारे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांचे हे १६ वे वर्ष असून राष्ट्रीय पुरस्कार सन्मानचिन्ह, ₹१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) आणि राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानचिन्ह, ₹५१,०००/- (रुपये एकावन्न हजार फक्त) अशा स्वरूपाचे आहेत, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने देण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन धर्मरक्षण, राष्ट्रहित, सेवा क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन मंडळातर्फे गौरविण्यात येते. यंदा स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास क्षेत्रात काम करणाऱ्यांना हे पुरस्कार संस्थेतर्फे जाहीर झाले आहेत. फुटीरतावाद आणि धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलेल्या मिझोराम राज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी ‘शुभान फौंडेशन’ यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन दशकांहून अधिक काळ ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्यायनिवारण तसेच आरोग्यविषयक कार्य करीत असलेल्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार प्रदान सोहळा सर्वांसाठी खुला असून सावरकरप्रेमींसह सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी केले आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.