*शरद पवार-अजित पवार एकच !*
सत्तेसाठी शरद पवारांची ही खेळी आहे :- सेंगर
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई : खरं तर शरद पवार यांची देशाच्या राजकारणात ओळख तेल लावलेला पैलवान अशी आहे. कोणताही डाव खेळला तरी विरोधकांच्या हातात कधीच हातात न सापडणे ही त्यांच्या राजकारणाची खासियत राहिली आहे. बाकीचे बेसावध असताना शरद पवार अशी खेळी खेळतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे राजकारणात धोकादायक समजले जाते. याचा त्यांना फायदा देखील झाला आहे आणि तोटा देखील झाला आहे.
“आपल्या प्रतिस्पर्ध्याना आपल्या डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणं, ही हातोटी राजकारणात असावी लागते, ती त्याच्याकडे आहे आणि तिचा वापर ते खुबीनं करत असतात”.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकांचे निकाल पूर्ण हाती येण्याआधीच संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन भाजपा सरकार स्थापण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चा पाठिंबा जाहीर करून टाकला. या घोषणेनं राजकीय पक्षांना आणि राजकीय विश्लेषकांना कोड्यात टाकलं.”
ईड़ी, सीबीआई चौकशी लागू नये म्हणून तसेच सत्तेमध्ये राहावे म्हणून त्यांनी अजित पवार यांना भाजपा सत्तेमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे.
संपूर्ण शरद पवार सह संपूर्ण राष्ट्रवादी बीजेपी सरकारमधील सहभाग त्याच्याकरता झाली नाही की अल्पसंख्यांक मते ही काँग्रेसकडे वळतील म्हणून शरद पवार यांनी भाजपापासून दूर राहण्याचा डावपेच असावा असे “हिंदू लॉ बोर्ड” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी प्रतिपादन केले.