You are currently viewing बांदा-डेगवे-असनिये मार्गे घारपी एसटी बस सेवा सुरू करणे संदर्भात जिल्हा काँग्रेस व ग्रामस्थांचे सावंतवाडी आगरप्रमुखांना निवेदन सादर 

बांदा-डेगवे-असनिये मार्गे घारपी एसटी बस सेवा सुरू करणे संदर्भात जिल्हा काँग्रेस व ग्रामस्थांचे सावंतवाडी आगरप्रमुखांना निवेदन सादर 

बांदा-डेगवे-असनिये मार्गे घारपी एसटी बस सेवा सुरू करणे संदर्भात जिल्हा काँग्रेस व ग्रामस्थांचे सावंतवाडी आगरप्रमुखांना निवेदन सादर

सावंतवाडी

बांदा-डेगवे-तांबुळी-असनिये मार्गे घारपी एसटी बस सेवा सुरू करणेबाबत जिल्हा काँग्रेस व ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी आगरप्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बांदा-डेगवे-तांबुळी-असनिये मार्गे घारपी एसटी बस सेवा सुरु करावी, शहरा नजीकच्या गावातील विद्यार्थी, नोकरी निमित्त गोवा येथे जाणारे युवक -युवती, वृद्ध यांना कमी वेळेत जाता यावे यासाठी एसटी बस सुरू करणे गरजेचे आहे.
संबंधित रस्ता पूर्ण होऊन कित्येक वर्षे झाली असून या मार्गावर कुठचीही एसटी सेवा सुरू नाही आहे. अजूनही येथील सामान्य नागरिक, विद्यार्थी युवक-युवती एसटी बसच्या प्रतीक्षेत आहेत. यानिमित्ताने शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरीनिमित्त गोवा येथे जाणारे युवक-युवती तसेच गावातील नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी खूप सोयीस्कर होईल.
यावेळी जिल्हा काँग्रेस सचिव केतनकुमार गावडे, सावंतवाडी तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष संजय लाड, तालुका काँग्रेस पदाधिकारी भाऊसाहेब देसाई व तांबुळीतील काँग्रेस कार्यकर्त्ये व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा