*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मुक्या माराचे बोलके डाग!*
हल्ली राग लोभही झालेत परके
कोणी कुणाचे देणे लागत नाही
निष्ठाही आज अप्रामाणिक झाल्यात
मनावर घेणं!आता परवडतही नाही..!
उगाच ज्ञानाचे बिरडे बांधून
गळ्यांत वैराग्याचा पट्टा बांधतो
पाठीची निरूत्तर ढाल कायम ठेवत
पाठीचं व्यासपीठ !वक्तव्याकरता खुलं ठेवतो…
मुक्या माराचे बोलके डाग!मनांत वसलेले …
तोंडात घोळत!छातीशी घट्ट लपेटून घेतो
स्नेहपाशात हरवलेला सन्मान चाचपडत
निरोपाची बडीशेप!उत्सुक हातावर ठेवतो..अलगद कोंबतो ..!
दाह-क्लेष-नाती!भरकटत भरकटल्या
संन्यस्त होऊन !अभिशापातून मुक्त होतो..
राग द्वेष प्रीती !हे त्रांगड दूर सारत
माणूस नावाच्या प्रदूषणातून दूर होतो
मुक्या माराचे बोलके डाग
अभावतही भरून घेतो
देहावरचे संजीवक हावभाव
अधूनमधून निरखून बघतो..
बाबा ठाकूर धन्यवाद