You are currently viewing काळोख

काळोख

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काळोख..!*

 

उजेडाचा तिकडेच

बघा ना रोख असतो,

जिकडे सर्वात जास्त

काळा काळोख असतो..।१।

 

कोण काय करीतो ते

कुणास कळत नाही,

कळाले तरीही मग

काहीच वळत नाही..।२।

 

जीवना मध्ये एकाच्या

अंधाराचे अधिराज्य,

दुसऱ्याच्या आयुष्यात

प्रकाश हा अविभाज्य..।३।

 

उजाडले तरी नाही

उजेड दृष्टिक्षेपात,

मावळती काजळाला

संगे घे ऊ न येतात..।४।

 

फार मोठे काम नाही

काळोख संपवायचे,

प्रकाशाचे काही दिवे

आहे फक्त लावायचे..।५।

 

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)*

*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा