You are currently viewing सावंतवाडीत आजपासून सैनिक पतसंस्थेचा “सांस्कृतिक कला महोत्सव”…

सावंतवाडीत आजपासून सैनिक पतसंस्थेचा “सांस्कृतिक कला महोत्सव”…

सावंतवाडीत आजपासून सैनिक पतसंस्थेचा “सांस्कृतिक कला महोत्सव”…

सावंतवाडी

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग आणि सहयोगी संस्था सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत जगन्नाथ भोसले उद्यान सावंतवाडी समोरील भव्य पटांगण येथे होणार आहे. या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले आहे.

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग आणि सहयोगी संस्था सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचे मालवणी कविता गायक व नांदेड येथील प्रसिद्ध गायक धनंजय जोशी यांचा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान होणार आहे तसेच १७ फेब्रुवारीला सायंकाळी सहवेश गीत गायन स्पर्धा होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा येथील प्रसिद्ध गायक यांचा सहभाग असणार आहे तर १८ फेब्रुवारीला दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा ट्रिक्स इन युक्त दशावतार नाट्यपयोग रात्री ७ वाजता होणार आहे. तर १६ व १७ फेब्रुवारीला उपस्थित प्रेक्षकांमधून विनामूल्य कुपनद्वारे “लकी ड्रॉ” च्या माध्यमातून खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. यावेळी १६ तारीख ला गॅस शेगडी, सिलिंग फॅन, नंदादीप या वस्तू देण्यात येणार आहेत. तर १७ फेब्रुवारीला मिक्सर, कुकर आणि समइ या भेटवस्तू देण्यात येणार आहे. उपस्थित प्रेक्षकांतुन लकी ड्रॉ असल्याने निकालानंतर भेट वस्तू १५ मिनिटांच्या आत घेणे बंधनकारक आहे. विनामुल्य कुपन संस्थेचे प्रधान कार्यालय, शहर शाखा व कोलगांव शाखा येथे सर्वांसाठी १३ फेब्रुवारी पासून उपलब्ध रहातील. कार्यक्रम स्थळी सुद्धा ६ ते ७ या वेळेत उपलब्ध रहातील. कुपनचे काऊंटर जमा करणे अत्यावश्यक आहे. प्रतिव्यक्ती २ कुपन मिळेल. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा