You are currently viewing “श्री गणेशाची भूपाळी”

“श्री गणेशाची भूपाळी”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

ही गणेशाची मूर्ती कर्जत रायगड जवळील कडाव येथील श्री बालदिगंबर येथील मंदिरातील आहे.

 

*”श्री गणेशाची भूपाळी”*

उठ पहाट झाली शिव पार्वती सुकुमार

नमितो बालदिगंबरा कृपा कर सर्वांवर IIधृII

 

सर्व कार्यारंभी करिती जय जयकार

वक्रतुंड सिद्धी विनायक तू विघ्नहर

सर्वजन प्रार्थिती तव दर्शना अधीर II1II

 

पूर्व दिशेला वाट पाहे अरुण रथावर

पक्षी करती किलबिल गुंजारव मधुर

उघडावे नेत्र द्यावे दर्शन सत्वर II2II

 

सहस्त्र वर्षांची तव महती आहे थोर

कण्वमुनिंनी स्थापिले गणपती मंदिर

कडाव गावचे वैभव कीर्ती तव अपार II3II

 

चतुर्भुज गजमुख भालचंद्र रक्तवर्ण

अकार ऊकार मकार असशी ज्ञानसागर

कटीवर सर्प खेळे आहेस बालदिगंबर II4II

 

नवसाला पावसी सर्वां होई साक्षात्कार

देशोदेशीचे भक्त येती तव दर्शनार्थ

बुद्धी वरदाता सर्वांचे करा शुभंकर II5II

 

श्री अरुण गांगल, कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा