*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌹 *प्रीत* 🌹
*ही प्रीत माझी अबोल अशी*
*सख्या तुज़ला मी सांगू कशी*
*राजसा तुझविण मी जशी*
*बघ ना जाहली रे वेडीपिशी*
*मी तुझीच प्रेमदिवानी अशी*
*सांग तुला मी विसरू कशी*
*स्वप्नी तू माझ्या येशी*
*दूर देशी तू मज़ नेशी*
*तू असा कसा परदेशी*
*का मला सोडूनी जाशी*
*भेट झाली एक जराशी*
*ती जपली मी उराशी*
*मजविण आहे तू उपाशी*
*मी कसे खाऊ रे तुपाशी*
*प्रेमाविण जग हे विनाशी*
*प्रेम असे हे अविनाशी*
*प्रेमाने मन जुळती मनाशी*
*प्रेमाचे कण मिळती कणाशी*
*तू ये परत फिरूनी दाराशी*
*तिच मजला काबा काशी*
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो. 9420095259*