You are currently viewing अव्यक्त अबोली बहूउद्देशीय संस्थेच्या राज्यस्तरी साहित्य समेलनासाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांची अभिनंदनीय निवड

अव्यक्त अबोली बहूउद्देशीय संस्थेच्या राज्यस्तरी साहित्य समेलनासाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांची अभिनंदनीय निवड

नेरूळ / नवी मुबई :

जळगावच्या जेष्ठ लेखिका कवयित्री शैलजा करोडे यांची अव्यक्त अबोली बहु उद्देशिय संस्थेच्या पाचव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्षपदी निवड झालेली आहे .पुलगाव जि वर्धा येथे हे संमेलन 28 एप्रिल 2024 रोजी होईल अव्यक्त अबोली साहित्य मंच परिवाराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित साहित्य संमेलनात उद्घाटन सोहळा, परिसंवाद, एकांकिका गझल मुशायरा, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

हे साहित्य संमेलनाचे पाचवे वर्ष असून उत्कृष्ट नियोजन आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातून साहित्यिक मंडळीचा सहभाग हे या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री तथा साहित्यिका, लेखिका  .शैलजा करोडे जळगाव/ नेरूळ नवी मुंबई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शैलजा करोडे यांचे लोकसाहित्यावरील पुस्तक ” खानदेशची लोकसंस्कृती व लोकधारा  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून लावले आहे.महाराष्ट्र शासनाचा डाॅ. बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार, गुणवंत कामगार पुरस्कार ,कामगार भूषण, दै. लोचमतचा सखी पुरस्कार , दै. सकाळचा तेजस्विनी पुरस्कार तसेच ग्लोबल इकॉनॉमिक कौन्सिल नवी दिल्ली यांचा राष्ट्रीय रतन पुरस्कारासह अनेक पुरस्कार   प्राप्त कवयित्री असून नव साहित्यिकांना एकत्रित आणून मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत.या सर्व बाबींचा विचार करून त्यांची पाचव्या अव्यक्त अबोली साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे अव्यक्त अबोली संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री चव्हाण आणि सचिव योगेश ताटे यांनी कळवले आहे आणि कवयित्री.शैलजा करोडे यांना सविस्तर निवडपत्र दिले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा