You are currently viewing जेवलास कां? ..जेवलास..!!

जेवलास कां? ..जेवलास..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जेवलास कां? ..जेवलास..!!*

 

आज ताट भरलंय

पण वाढायला कोणी नाही

आईला आवाज देतो

ती ओ! देत नाही …!

 

पाक नाही जमला

की!ती लाडू वळायची

पोराच्या सुखाकरता

जमेल ते ती करायची ..!

 

भाजी नाही आवडली

की! शिक्रण करून द्यायची

पोरगं उपाशी राहू नये

म्हणून तीच उपवास करायची ..!

 

पोरानं ताटात पोळी टाकली

ती जोरात ओरडायची

धम्मक लाडू देत पोळीचा

लाडू करून द्यायची ..!

 

आई!जाईपर्यंत तू तुझ्या

पोराला भरवत राहीलीस

शेवटच्या क्षणी विचारलसं

……………….जेवलास……

जेवलास कां?…!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा