कर्जमाफी द्या, अन्यथा आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालू…
शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा; सक्तीची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी…
सिंधुदुर्गनगरी
खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार घालू, असा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. वारंवार शासनाकडे मागणी करून सुद्धा लाभ देण्यात न आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहे. एक तर कर्जमाफी करा किंवा सक्तीची वसुली थांबवा अन्यथा आत्महत्ये शिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यातील भात पिक व आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही यासाठी त्यांनी आज सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले .
सन २०१७ च्या यादीतील ३०७७ शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत अनेकवेळा आंदोलने केली उपोषण केले तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही . आता शेतकऱ्या पुढे आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे २ लाख वरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दया . तसेच सक्तीची कर्ज वसूली तात्काळ थांबवावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी आग्नेय फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर ,प्रकाश वारंग, सुरेश गावकर, महेश चव्हाण,सुधीर परब, लाडू परब, श्यामसुंदर राय आदीं शेतकरी उपस्थित होते.