You are currently viewing साक्षी रामदुरकरची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी सलग दुस-या वर्षी निवड

साक्षी रामदुरकरची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी सलग दुस-या वर्षी निवड

सावंतवाडी :

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने वसमत, हिंगोली येथे शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा 2023 – 24 याचे आयोजन करण्यात आले.

सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची बारा वर्षीय विदयार्थिनी कु.साक्षी रमेश रामदुरकर हीने या स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात सहभाग घेऊन सलग दुस-या वर्षी राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळवला.तामिळनाडू येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.सलग दुस-या वर्षी निवड झालेली ती एकमेव खेळाडू ठरली आहे.

सावंतवाडी संस्थानच्या राणीसरकार शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे आणि युवराज्ञी श्रदधाराजे, जयप्रकाश सावंत यांनी कु.साक्षीचे कौतुक करताना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि कॅरम प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कु.साक्षीने हे यश मिळवले आहे.सर्व स्तरावरुन तिचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा