You are currently viewing नाथ पै सेवांगणचे आयोजित “माझ्या मनातील राम” निबंध स्पर्धेत डाॅ. दर्शना कोलते प्रथम…

नाथ पै सेवांगणचे आयोजित “माझ्या मनातील राम” निबंध स्पर्धेत डाॅ. दर्शना कोलते प्रथम…

नाथ पै सेवांगणचे आयोजित “माझ्या मनातील राम” निबंध स्पर्धेत डाॅ. दर्शना कोलते प्रथम…

अदिती पै द्वीतीय तर सतिश लळीत तृतीय…

सिंधुदुर्गनगरी

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझ्या मनातील राम” या निबंध स्पर्धेत डॉ दर्शन कोलते यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर अदिती पै आणि सतीश लळीत यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्ष ऍड देवदत्त परुळेकर आणि परीक्षक प्रसाद घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला किशोर शिरोडकर, राजा खांदाळेकर, दीपक भोगटे, लक्ष्मीकांत खोबरेकर, सुभाष नेरूरकर, बापू तळवडेकर, शैलेश खांडाळेकर, ऍड पी बी देसाई, वंदना किनळेकर, सुजाता पावसकर, सतीश लळीत, सायली चव्हाण, डॉ दर्शन कोलते, डॉ हर्षदा देवधर, वंदना घाणेकर, मंगल परुळेकर, ऍड संदीप निंबाळकर, ऋषी देसाई यांच्यासह असंख्य उपस्थित होते.

या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून मेघना जोशी, डॉ हर्षदा देवधर, सायली चव्हाण, डॉ हेमंत पेडणेकर, काव्य विनोद दळवी यांनी बाजी मारली. तर उल्लेखनिय निबंध म्हणून संजय तांबे, विनिता पांजरी, जीवन लोटे, शुभांगी सौदागर, जान्हवी बांदवलकर, अंकिता पाटील, मैत्रेयी बांदेकर, शुभदा पेडणेकर, वैष्णवी आचरेकर, मनाली वेंगुर्लेकर, संजय आचरेकर, सुधीर गोसावी यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक १५०१ रुपये, द्वितीय क्रमांक १००१ रुपये आणि तृतीय क्रमांक ७०१ रुपये तसेच उत्तेजनार्थ पाचही क्रमांकाना प्रत्येकी ५०० रुपये रोख तसेच प्रशस्ती पत्र, सन्मानचिन्ह याशिवाय उल्लेखनीय निबंध ठरलेल्या बारा स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाचा प्रारंभ ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सिताराम’ या गाण्याने करण्यात आली. यावेळी ऍड परुळेकर यांनी ‘ राम, रामकथा आणि गांधी ‘ यावर संवाद साधताना प्रत्येकाच्या जीवनात राम याला अनन्य साधारण महत्व आहे. पण रामायणात चुकीच्या माहिती जोडण्याचा प्रकार अनेक लोकांनी केला आहे. परंतु निःपक्षपातीपणा आणि समानता म्हणजे राम, असे स्पष्ट केले. परीक्षण प्रसाद घाणेकर यांनी, या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने लोकांनी रामायण खूप वाचले आहे. खऱ्या बरोबर रचलेल्या राम कथा सुद्धा वाचल्या आहेत. तसेच अजूनही लोक निबंध लिहितात याबाबत आश्चर्य वाटले. यात लहान मुलांपासून वयोवृध्द व्यक्ती सहभागी झाले असल्याचे सांगितले. यावेळी सतीश लळीत, डॉ दर्शन कोलते, डॉ हर्षदा देवधर, सायली चव्हाण, ऋषी देसाई यांनीही विचार मांडले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा