*दोडामार्ग तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात 20% टक्के मनसे बांधकाम*
*सिंधुदुर्ग जिल्हा पक्षनिरीक्षक तथा राज्य सरचिटणीस गजानन राणे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिसाद..*
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सिंधुदुर्ग:
मनसेचा जो पदाधिकारी काम करताना दिसणार नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे. आपण असो किंवा कुठलाही पक्षाचा कुठलाही पदाधिकारी असला तरी त्याला पदावरून बाजूला केली जाईल जो पक्षाचे काम करेल तोच पक्षात टिकेल, असा इशारा मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक व राज्य सरचिटणीस गजानन राणे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी येथे दिला.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपण स्वतः पक्षांमध्ये कार्यरत नव्हतो, असे स्पष्ट केले आहे त्यामुळे जो पदाधिकारी पक्षांमध्ये काम करीत नसेल त्याला त्या पदावरून बाजूला केले जाते, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.
*मनसे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक*
श्री गजानन राणे तसेच मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव यांच्या पिंगुळी येथील निवासस्थानी मनसे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राणे व श्री दळवी यांनी पत्रकारांची संवाद साधला. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब व अँड अनिल केसरकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर व चंदन मेस्त्री,, कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे, सचिव सचिन तावडे, सावंतवाडी विधानसभा महेश परब, सचिव गुरुदास गवंडे, वैभववाडीचे चंद्रशेखर सावंत, कुडाळ विधानसभा संपर्क अध्यक्ष सचिन सावंत, विश्राम लोके, हेमंत जाधव, गणेश वाईरकर, गुरुदास गवंडे, चंदन मेस्त्री, प्रशांत सादये मिलिंद सावत, सनी बागकर, प्रीतम गावडे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री राणे म्हणाले, काही महिन्यापूर्वीच या जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर संघटना बांधणीसाठी सुरुवात केली आहे.
दोडामार्ग तालुका वगळता अन्य प्रत्येक तालुक्यात २० टक्के बांधणी करण्यात आली आहे. मुंबई येथील पदाधिकाऱ्यांवर तालुका संपर्कप्रमुख, सहसंपर्क, उपसंपर्क अशा पदांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगून जिह्यात शाखा निहाय नव्याने बांधणी सुरू आहे. कुडाळ तालुक्यात 11 देवगड मध्ये 11 सावंतवाडी 7 तसेच कणकवली, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ले येथेही शाखा निहाय बांधणीचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. देवगड मध्ये एका खासगी वित्तीय संस्थांच्या ठेवीदार महिलांच्या बाजूने तेथील आमच्या पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व करून त्याच्या पाठीशी राहिले, असे ते म्हणाले. दोडामार्ग मध्ये आम्ही पक्ष संघटना बांधणीत कमी पडत आहोत. तेथे पाहिजे तसे पदाधिकारी मिळत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
श्री उपरकर वर्षभरापासून पक्षात कार्यरत नव्हते आणि जो पदाधिकारी पक्षाचे काम करताना दिसला नाही तर त्याला पदावरून बाजूला केले जाते. ते संपर्कात नव्हते. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण त्यांची पक्षात काम करण्याची इच्छा दिसत नव्हती. बैठका घेणे, आंदोलनाचे इशारे देणे, त्यापेक्षा आंदोलन करणे गरजेचे होते, जे आमचे पदाधिकारी पदावर नसताना आंदोलने करीत होते. उपरकर यानी आंदोलने केली असती, तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. राज ठाकरे यांनी सन 2006 मध्ये मनसेची स्थापना केली, तर सन 2012 मध्ये ते या पक्षात आले पक्षात प्रगती दिसत होती म्हणून ते आले. त्यानंतर त्यांनी एवढी वर्ष पक्षात काम केले. परंतु कधीतरी भाकरी पलटली पाहिजे ते आम्ही केले, असे राणे यांनी सांगितले. राज ठाकरे यांचे आम्ही शिलेदार आहोत त्यांचा शब्द पाळणार आहोत या जिल्ह्यात यापुढे या पक्षात कुठेही गट दिसणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री दळवी म्हणाले, गावागावात पक्ष पोहोचला तर संघटना वाढणार आहे त्यासाठी शाखा निहाय बांधणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
*संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*