You are currently viewing पडीक जमिनीत नवे उद्योग निर्माण करून कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करावा

पडीक जमिनीत नवे उद्योग निर्माण करून कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करावा

सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन..

 

ओरोस :

 

सिंधुनगरी येथील शरद कृषी भावनांमध्ये केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत नवउद्योजक व बचत गटांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. यावेळी व्यासपीठावर खाली बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीनजी कुमार संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण शुक्ला, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळशेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,भाजपाच्या महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी सौ नीता राणे, प्रज्ञा ढवण, गजानन गावडे, नॅसकॉम फाउंडेशनचे प्रमुख डॉ. चेतन सामंत उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कोटी लोकांना घरकुले, ११ कोटी लोकांना पाण्याची पाईपलाईन निर्माण करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरही लक्ष दिले. देशातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. केरळमधील काथ्या उद्योग, आसाम मधील बांबू उद्योगांचे प्रेरणा येथील उद्योजकांनी घ्यावी. जिल्ह्यातील दोन तृतीयांश पडीक जमिनीचा त्यासाठी वापर करावा व नवे उद्योग निर्माण करून कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करावा असे आवाहन सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

देशातील उद्योग व्यवसायाने मोठी भरारी घेतली आहे. अनेक प्रांतात निर्यात क्षम उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश तिसऱ्या स्थानावर यावा यासाठी प्रयत्न सुरू केले असून देशाच्यातील उद्योग क्षेत्राला चालना दिली आहे. नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी दिशा दिली आहे. अनेक राज्यानी उद्योग व्यवसायाच्या विस्तारासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्यामुळे निर्यात क्षम उद्योग या देशात उभे राहत आहेत. खरे तर आपल्या देशात अजूनही गरिबी दारिद्र्य कुपोषणाचा प्रश्न भेडसावत आहे. हे प्रश्न सोडवितानाच देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राला चालना देऊन नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहिला आहे.

कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग जिल्हा काही वर्षांपूर्वी दरडोई उत्पन्नात फारच मागे होता. आताची परिस्थिती पाहता दरडोई उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग पुढे गेला आहे. जिल्ह्यातील एक तृतीयांश जमीन शेती बागायती खाली आहे. परंतु दोन तृतीयांश जमीन पडीक आहे. पडीक जमिनीचा वापर करून उद्योजकांनी केरळ आसाम राज्यातील उद्योग व्यवसायाप्रमाणे उद्योग करावेत. स्वतःचे उत्पन्न वाढविताना येथील उद्योग व्यवसायाला चालना देऊन सिंधुदुर्ग जिल्हा श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन यानिमित्ताने नारायण राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा