*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाब*
फुलांचा राजा
डौल त्याचा आगळा
दिसतो वेगळा
उठून…….
मऊ तलम
पाकळी सुंदर मखमली
गंधित कळी
आकर्षक……
कोटावर दिमाखात
रुळतो स्त्रियांच्या कुंतलात
भर सौंदर्यात
ललनेच्या……
रांगोळीत सजतो
काढता वहीच्या पानावर
स्मित गालावर
हमखास……
डायरीच्या पानाआडून
अधून मधून डोकावते
सुगंधी जागते
आठवण……
प्रेमाचं समर्पण
प्रतिक गुलाब फूल
अव्यक्त कबूल
मनातील…….।।
००००००००००००🌹🌿🌹
अरुणा दुद्दलवार@✍️