You are currently viewing सूर जुळे नवा 

सूर जुळे नवा 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

सूर जुळे नवा 

*सर्वा वाटे हेवा*

असा धागा मिळे

*साथ देई देवा*

……..!!१!!

 

संवाद मिडिया ही

*वाहिनी अशी एक*

लेखणीस मिळे

*वाव हो अनेक*

…….!!२!!

 

साहित्य अचूक

*देणाऱ्या नात्यांचे*

घट्ट विणलेले

*जाळे सुमनांचे*

……..!!३!!

 

दूर राहुनिया

*लेखणीने सारी*

सांधलेली मने

*जोडलेली न्यारी*

……….!!४!!

 

मा.पटेकर साहेब

*तुमची मिळे साथ*

कौतुकाची थाप

*मदतीचा हात*

……..!!५!!

 

नवोदित कुणी

*आल्यावर कसे*

उत्कृष्ट बनती

*साहित्यिक असे*

………!!६!!

 

हिच आहे इथे

*निःस्वार्थ भावना*

दुसऱ्यास देणे

*हाच साधेपणा*

…….!!७!!

 

मा.दीपक पटेकर

*साहेब आभार*

निर्मिला सर्वांचा

*असा परिवार*

…….!!८!!

 

हास्य फुलवीत

*कवीच्या मनात*

वाटा उन्नतीच्या

*सन्मान जनात*

……..!!९!!

 

साहित्य लिहाया

*स्फूर्ती मिळे फार*

म्हणुनी मानते

*आपले आभार*

✍️✍️✍️✍️✍️✍️

*सौ. वंदना राजेंद्र गवळे* *उर्फ वंदना पाटकरी*

शिक्षिका

डॉ. विजयरावं व्ही रंधे इंग्लिश मेडीयम स्कूल

*शिरपूर जि धुळे*

प्रतिक्रिया व्यक्त करा