You are currently viewing स्मृति भाग ४४

स्मृति भाग ४४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४४*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण अत्रि ऋषिंनी सांगितलेले दहा ब्राह्मण प्रकार पाहू .

 

*देवो मुनिर्द्विजो राजा वैश्यः शूद्रो निषादकः ।*

*पशुर्म्लेंच्छोSपि चाण्डालो विप्रा दशविधाः स्मृताः ॥*

देव , मुनि , द्विज , राजा , वैश्य , शूद्र , निषाद , पशु , म्लेंच्छ आणि चाण्डाल असे हे दहा प्रकारचे ब्राह्मण सांगितलेले आहेत .

 

*संध्या स्नानं जपं होमं देवतानित्यपूजनम् ।*

*अतिथि वैश्वदेवञ्च देवब्राह्वण उच्चते ॥*

संध्या , स्नान , जप , होम , देवता व अभ्यागतांचे नित्य पूजन , बलिवैश्वदेव जो करतो त्याला *देव ब्राह्मण* म्हणतात .

 

*शाके पत्रे फले मूले वनवासे सदा रतः ।*

*निरतोSहरहः श्राद्धे स विप्रो मुनिरुच्चते ॥*

शाक , पाने , फळे व मूळं यांचे भक्षण करणारा , वनात राहणारा , प्रतिदिन श्राद्ध करण्यात तत्पर असणार्‍या ब्राह्मणास *मुनि* म्हणतात .

 

*वेदान्तं पठते नित्यं सर्वसंग परित्यजेत् ।*

*सांख्ययोगविचारस्थः सविप्रो द्विज उच्चते ॥*

जो वेदान्ताचे नित्य वाचन करतो , सर्वसंग परित्याग करुन सांख्य व योगशास्त्राच्या विचारात गढलेला असतो , त्या ब्राह्मणास *द्विज* म्हणतात .

 

*अस्त्राहताश्च धन्वानः संग्रामे सर्वसंमुखे ।*

*आरभे निर्जिता येन स विप्रः क्षात्र उच्चते ॥*

ज्याने सर्वांसमक्ष संग्रामात धनुषधारींना मारले आहे आणि ज्याने आरम्भापासून शेवटपर्यंत युद्ध खेळलेले आहे त्या ब्राह्मणास *क्षत्रिय* म्हणजे *राजा* ब्राह्मण म्हणतात .

 

*कृषिकर्मरतो यश्च गवां च प्रतिपालकः ।*

*वाणिज्य व्यवसायश्च स विप्रो वैश्य उच्चते ॥*

जो शेतीकामात मग्न आहे , गाई पाळणारा आहे , देवाणघेवाणाचे व्यवहार जो करतो , अशा ब्राह्मणास *वैश्य* म्हणतात .

 

*लाक्षालवणसंमिश्रं कुसुम्भं क्षीरसर्पिषः ।*

*विक्रेता मधुमांसानां स विप्रः शूद्र उच्चते ॥*

लाख , मीठ , कुसुम्भ , दूध , तूप , मिठाई व मांस यांना विकणार्‍या ब्राह्मणास *शूद्र* म्हणतात .

 

*चौरश्च तस्करश्चैव सूचको दंशकस्तथा ।*

*मत्स्यमांसे सदालुब्धो विप्रो निषाद उच्चते ॥*

चोरी , तस्करी , चुगलखोरी , दुसीर्‍यास अकारण छळणारा , मत्स्यमांसावर सदा लुब्ध असणार्‍यास *निषाद* म्हणतात .

 

*ब्रह्मतत्वं न जानाति ब्रह्मसूत्रेण गर्विता ।*

*तेनैव स च पापेन विप्रः पशुहरुदाहृतः ॥*

जो वेदतत्व जाणत नाही आणि फक्त यज्ञोपविताचा गर्व आहे , असे पाप करणार्‍यास *पाशवी वा पशु* म्हणतात .

 

*वापोकूपतडागानामारामस्य सरःसु च।*

*निःशंकं रोधकश्चैव स विप्रो म्लेंच्छ उच्चते ॥*

आड , विहीर , थोडेसे संचित जल , बाग , छोटा तलाव यातील पाणी जो रोखतो वा राखतो ( कुणास घेवू देत नाही ! ) अशास *म्लेंच्छ* म्हणतात .

 

*क्रियाहीनश्च मूर्खश्च सर्वधर्म विवर्जितः ।*

*निर्दयः सर्वभूतेषु विप्रश्चाण्डाल उच्चते ॥*

जो क्रियाहीन आहे , मूर्ख आहे , सर्वधर्मवर्जित आहे , संपूर्ण भूतांविषयी क्रूरकर्मा आहे , अशा ब्राह्मणास *चाण्डाल* संबोधावे .

सर्वप्रथम हे जसे ब्राह्मणाचे नाव घेवून सर्व प्रकार सांगितले , तसे क्षत्रिय — वैश्य व शूद्राचे देखिल असेच प्रकार पडतील ! कुणीही कुणाला नावे ठेवणे वा हेटाळण्याचे प्रकार व्हायला नकोत !!! इथे जो चाण्डाळाचा प्रकार सांगितला आहे , त्यावरुन जे धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवतात , ते सर्वच या चाण्डाल प्रकारात मोडतात !! या विषयी तज्ञांनी चर्चा करावी , असे वाटते .

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा