*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”सरस्वती वंदन”*
स्वागत करितो माते सरस्वती वंदन
अंतरी वसुदे निरंतर तव स्मरण।।धृ।।
पाऊले काढतो तव स्वागतार्थ सन्मान
करितो पाद प्रक्षालन अर्पितो सुमनं
आळवितो गौरवितो दीप ओवाळून।।1।।
श्रीहरीचे नाभी कमलस्थ विराजमान
असशी ब्रह्माचे प्रज्ञा स्थळा शोभून
प्रगटसी प्रभावे आनंदे देसी चैतन्य।।2।।
चंद्रबिंबासम विलसे तव वदन
शीश मुकुट धारी गळा रत्न माळ लेऊन
साम गीत गायन करी वीणा वादन।।3।।
सांकूर कुसुमीत धरा जाई फुलून
मुदीत होई चराचर लाभे सर्वत्र दर्शन
बुद्धिदाती करी सृष्टीचे पालन पोषण।।4।।
काश्मीर राज्ञी होसी तव विश्वात सन्मान
श्वेत वसन ल्यालेली मयूर तव वाहन
शरण आम्ही प्रार्थितो द्यावे सुख-समाधान।।5।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.