मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दुसऱ्या डावात इंग्लंडने एक गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप ३३२ धावांची गरज आहे. भारताने ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचवेळी भारतीय संघाला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडची आक्रमक शैली, ज्याला ‘बैजबॉल’ असेही म्हणतात आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडे १४३ धावांची आघाडी होती. भारताने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि एकूण ३९८ धावा झाल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने एका विकेटवर ६७ धावा केल्या आहेत. इंग्लंडला दुसऱ्या डावात एकमेव धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, तो अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद झाला. त्याला २८ धावा करता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जॅक क्रॉली २९ धावा आणि रेहान अहमद नऊ धावांसह खेळत होते.
चौथ्या दिवसाचे पहिले सत्र महत्त्वाचे ठरू शकते. सुरुवातीच्या षटकांत जसप्रीत बुमराहही टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननेही कहर केला. तिसऱ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता २८ धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली. अँडरसनने झटपट दोन धावा देत दोन बळी घेतले. त्याने आधी कर्णधार रोहित शर्मा आणि नंतर यशस्वी जैस्वालला तंबूमध्ये पाठवले. रोहितला १३ तर यशस्वीला १७ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही २९ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार नऊ धावा करून बाद झाला. त्याचवेळी शुभमनने अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. शुभमनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. अक्षर ४५ धावा करून बाद झाला. भरत सहा धावा करून बाद झाला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. अश्विनने अखेरीस २९ धावांची समंजस खेळी केली. अशा प्रकारे भारताने दुसऱ्या डावात ३९८ धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले. तर रेहान अहमदला तीन आणि जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या. शोएब बशीरने एक विकेट घेतली.
*संवाद मिडिया*
*कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी*
*सविस्तर वाचा 👇*
————————————————
चला *फणस* रूपी कोकणच्या *पिवळ्या धम्मक सोन्याचे* नानाविध स्वादिष्ट पौष्टिक, आरोग्यदायी असे *मौल्यवान दागिने* घडवूया.
फणस हे सर्वात *आरोग्यदायी* आणि *बहुमोली* असलेलं फळ आहे. खरंतर भाजी आणि फळ या दोन्ही प्रकारात फणस मोडला जातो.
*डायबेटिस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, अस्थमा, वेट लॉस, डोळ्यांचे विकार, त्वचेचे आजार अशा अनेक समस्यांवर फणस खूपच उपयुक्त असल्याचे त्यावर झालेल्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे.*
फणसामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, फायबर, अँटी ऑक्सीडन्ट्स अशा विविध आरोग्यदायी घटकांचा समावेश असल्याने वैद्यकीय दृष्टीने फणसाचं महत्व जास्तच वाढलं आहे.
कोवळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, त्याच्या आठळ्या व चारखंड यापासून खूप सारे प्रॉडक्ट्स बनवता येतात आणि त्याचा आस्वाद विविध माध्यमातून घेता येतो, सेवन करता येते.
कच्चा गऱ्यांची पावडर, आठळ्यांची पावडर, चारखंड पावडर यांना प्रचंड मागणी असून विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो.
*फणसाचे जॅम, जेली, सरबत, चॉकलेट, केक, आइस्क्रीम, श्रीखंड, खीर, बिस्किट्स, लोणची, भाज्या, वेगन मीट, बिर्याणी, सूप, मंचुरीयन, टिक्का, चिली असे खूप सारे प्रॉडक्ट्स तयार करता येतात.*
*अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने फणसापासून विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवण्याचे 3 दिवसीय *प्रॅक्टिकल प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.
*कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण सकाळी 10 ते 5 या वेळेत संपन्न होणार आहे.*
या प्रशिक्षण शिबिरासाठी *पूर्व नोंदणी* करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणीसाठी आणि या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी JACK असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवावा
*Jack Magic*
-फणस प्रक्रिया प्रशिक्षण*
*9-10-11 फेब्रुवारी*
*कुडाळ, सिंधुदुर्ग*
*टीम अभिनव*
8767473619
*अभिनव Jackfruit मिशन*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*