You are currently viewing नट वाचनालयात शालेय निबंध स्पर्धेच्या प्राथमिक गटात सारा शेख प्रथम…

नट वाचनालयात शालेय निबंध स्पर्धेच्या प्राथमिक गटात सारा शेख प्रथम…

नट वाचनालयात शालेय निबंध स्पर्धेच्या प्राथमिक गटात सारा शेख प्रथम…

बांदा

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाचे औचित्य साधून अंकुश रामचंद्र माजगावकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ नट वाचनालयात शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक गटात खेमराज हायस्कूलच्या सारा शाहिद शेख हिने प्रथम क्रमांक तर माध्यमिक गटात खेमराज हायस्कूलच्या सिमरन सुधीर तेंडोलकर हिने प्रथम क्रमांक मिळविला.
ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या प्राथमिक तर इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी या माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित होती.
या स्पर्धेचे आयोजन वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, प्रमुख पाहुणे अंकुश माजगावकर, सदस्य प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, महिला सदस्या सौ. स्वप्निता सावंत, अनंत भाटे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर व्यक्तींच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गेल्यावर्षी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्राथमिक गटात न्यू इंग्लिश स्कूल, भेडशीची रिया राजन अदारी हिला द्वितीय क्रमांक व जि. प. बांदा केंद्रशाळेची ईश्वरी संतोष वावळीये हीला तृतीय क्रमांक मिळाला. भिकाजी राजेंद्र देसाई, खेमराज हायस्कूल, बांदा व भूमी हनुमंत सावंत, न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
माध्यमिक गटात नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीची गौरी आनंद कोठावळे हीला द्वितीय क्रमांक व राजा शिवाजी विद्यालय, विलवडेची वैष्णवी बापू देसाई हीला तृतीय क्रमांक मिळाला. सिद्धाई अजित दळवी, राजा शिवाजी विद्यालय, विलवडे व गायत्री विवेकानंद केसरकर, माध्यमिक विद्यालय, डेगवे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
प्राथमिक गटासाठी ‘माझ्या गावचे वाचनालय’ व ‘माझा आवडता संत’ हे विषय असून शब्दमर्यादा ५०० शब्द व वेळ एक तास होता, या गटात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांना कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा होता. तर माध्यमिक गटासाठी ‘भारताचे चांद्रयान मिशन’ व ‘वाचनालय एक संस्कार केंद्र’ हे विषय असून शब्दमर्यादा ७०० शब्द व वेळ एक तास होता. या गटात एकूण ११ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांना कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा होता, त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार सचिव राकेश केसरकर यांनी केले. या कार्यक्रमास सौ. अर्चना सावंत, पूजा कामत, शिक्षक, पालक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा