*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम गवळण*
*गवळण*
अवधी अजून दिवस उजाडायला
गवळीणींनो लगबग जाऊ बाजाराला
उठला नसेल बाळकृष्ण यशोदेचा
अडविणार ना कोणी रस्ता मथुरेचा
अद्दल घडवू ग नवनीतचोराला ||१ ||
सख्यांनो सांगा वेणी कोणी ओढली ?
मटकी गोरसाची कोणीतरी फोडली !
भास भेडसावतो, चैन नाही जीवाला || २ ||
पावा वाजला, चैतन्याचा संचार झाला
पावले थांबली,माना वळल्या कशाला?
आनंदून लोणी खाऊ घालती नंदलाला || ३ ||
विजया केळकर________
नागपूर