You are currently viewing उध्दव ठाकरेंच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “जय्यत” तयारी…

उध्दव ठाकरेंच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “जय्यत” तयारी…

उध्दव ठाकरेंच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “जय्यत” तयारी…

सावंतवाडी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील शिवसैनिकांनी जोरदार स्वागताची तयारी सुरू केली आहे. गांधी चौक परिसरात होणार्‍या सभेला शिवसैनिकांची मोठी उपस्थितीत असणार आहे. दरम्यान विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब आणि तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी ठाकरे यांच्या स्वागताचे शहरात बॅनर लावून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शहरात येवून दुपारी सभास्थळाची पाहणी केली.

शिवसेना फुटी नंतर उद्धव ठाकरेंचा सिंधुदुर्गात पहिलाच दौरा असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी येथील सभा नियोजनाची पाहणी केली. सभेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी सावंतवाडी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उद्या दुपारी १२ वाजता ठाकरेंचे मोपा विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ठिक १२:४५ वाजता त्यांची सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर १:३० वाजता ते कुडाळच्या दिशेने प्रयाण करणार आहेत व कुडाळ मध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर ते मालवण येथील शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी जाणार आहेत, त्यानंतर मालवण बंदर जेटी तर त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला येथे ते जाणार असल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा