बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ तर्फे आयोजन
कुडाळ :
बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ तर्फे पिंगुळी येथील ‘आरोग्यम’ क्लिनिक (रवळनाथ प्लाझा) मध्ये रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत ‘आरोग्यम’ क्लिनिक च्या वर्धापनदिनानिमित्त फिजिओथेरपी निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . सदर शिबिरामध्ये अस्थिरोग, स्नायू संबंधित विकार ,स्नायू संबंधित वेदना, संधिवात, सांधेदुखी, खांदेदुखी, टेनिस एलबो हाता पायाला मुंग्या येणे, मणक्यामध्ये ग्याप, फ्रॅक्चर व अपघातानंतरचे दुखणे शीर व स्नायू आखडणे, कंबर पाठ व मानेचे दुखणे, स्पॉंडिलायसिस व सायटिका या रोगाबरोबरच
बालरोग पुनर्वसन :सेरेब्रली पाल्सी, डेव्हलपमेंटल डिले, बायफिडा, मॅक्कुलर डिस्ट्ॉफी, टॉर्टिकॉलीस, हृदय आणि फुफुसाचा विकार , मेंदूचा विकार ,मेंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर चेहऱ्याचा पॅरालिसिस, अर्धांग वायू, लकवा, जन्म किंवा अपघातामुळे आलेले अपंगत्व, क्रीडा इजा प्रतिबंध आणि पुनर्वसन इत्यादीवर सुद्धा निदान उपचार केले जाणार आहेत.
तरी समस्याग्रस्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा व सदर वेळेमध्ये उपस्थित राहून नोंदणी करून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.
पत्ता:आरोग्यम क्लिनिक, रवळनाथ प्लाझा, शॉप नंबर ३ व ४ कुडाळ वेंगुर्ले रस्ता म्हापसेकर तिठ्या जवळ पिंगुळी.