*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त भूपति*
*आठवणींचा कप्पा*
मी आठवणींचा कप्पा खोलुन बसतो
नकळत तेव्हा मज भूतकाळ बहु स्मरतो
मी सुखे शोधतो नेत्र निरांजन करुनी
सुख गवसे मजला ध्यास तुझा गं धरुनी
गत स्मृतींचा मग मनात मेळा भरला
ना कळे रिकामी कुठे कोपरा उरला
त्या घटना साऱ्या पापण्यांत घर करती
झरझर अश्रुंच्या धारा गाली झरती
मी खुशालचेंडू दुःख दडवुनी हसतो
भावूक जाहल्या प्रश्नांमध्ये फसतो
भरकटतो अन् मी जुन्या आठवा बनतो
तर कधीकधी मी मलाच विसरुन जातो
ते गाव मनीचे कधीच मागे सुटले
मन पक्षी झाले तिथे जावुनी बसले
रोखले कितीही तरी कधी ना थकले
बेधुंद होउनी स्वप्नांमध्ये रमले..
© दीपी..(दीपक पटेकर)
सावंतवाडी
८४४६७४३१९६