*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”विवेक वैराग्य”*
विवेक वैराग्य जीवन रथाची चक्रे दोन
विवेक वैराग्यानं होते जीवन संपन्नIIधृII
विवेकानं प्रश्नांची उत्तरे होतात आकलन
वैराग्य असावे पाण्यातील लोण्याप्रमाणं
वैराग्य विवेक साथीनं जीवन अर्थपूर्णII1II
विवेक वैराग्या शिवाय वाटे रूक्ष जीवन
विवेक वैराग्याने माणूस होतो मोकळा सुज्ञ
वैराग्यावीण विवेक ठरतो पोकळ आतूनII2II
ज्ञानाला विवेकाची झालर शोभते अर्थपूर्ण
विवेक शिकवतो जीवनाला घ्यावे सांभाळून
विवेकानं माणसाचे गळते अहंपणII3II
विवेक सूर्यासम असतो लखलखित
चालतो सदा विवेक ज्ञान मार्गावरुन
अविवेक लोभ मत्सर टाळावा सततII4II
मनातील विवेक सदैव ठेवावा जागृत
विवेका वरची काजळी दूर करावी सतत
विवेकाचे दीप उजळो सांगती ज्ञानेश्वरII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.