‘PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना’
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद
कणकवली
मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या सर्वात महत्वाकांक्षी अश्या PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशभर अत्यंत वेगाने सुरू आहे.या योजनेतील एक महत्वाचा टप्पा असलेल्या प्रशिक्षणासाठी सरकारने अनेक प्रशिक्षण केंद्रे सुरू केलेली आहेत.या केंद्रांचा लोकार्पण सोहळा आज मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
जिल्ह्यातील फोंडा केंद्रावर PM विश्वकर्मा जिल्हा समितीचा सदस्य या नात्याने उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी चिमनकर,प्रशिक्षण केंद्राचे डॉ विद्याधर तायशेट्ये, मनोज रावराणे,नामदेव मराठे शिक्षण संस्थेचे दीपेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.