सिंधुर्गातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी सायंकाळी करण्यात आल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत
बदल्या झालेले सहाय्यक निरीक्षक याप्रमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची बांदा पोलीस ठाण्यातून प्रभारी अधिकारी सागरी सुरक्षा शाखा सिंधुदुर्ग, अनिल व्हटकर यांची आचऱ्यावरून सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग, बळीराम सुतार यांची मालवण पोलीस ठाण्यावरून वेंगुर्ला पोलीस ठाणे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांची वेंगुर्ले पोलीस ठाण्यावरून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक या ठिकाणावरून बांदा पोलीस ठाणे, सुनील जाधव यांची मालवण पोलीस ठाण्यातून आचरा पोलीस ठाण्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद सूर्यवंशी यांची कुडाळवरून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.