निगडी,प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी यमुनानगर मधील द हॅपी फिट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावेळी कार्यक्रमात मुलांनी आपली कला सादर केली.
संस्थेला यावर्षी ७ वर्षे झाली आहेत. ४०० हून अधिक मुले पास होऊन पुढील शिक्षणासाठी मोठ्या शाळांमध्ये गेली आहेत .यावर्षी कार्यक्रमात एकूण ५० मुलांनी सहभाग घेतला होता.
वर्षभरात शाळेत स्पोर्ट्स डे ,ग्रँड पेरेंट्स डे ,फॅन्सी ड्रेस, फन फेअर ,ॲन्यूअल गॅदरिंग, कलर डेज फील्ड विजिट, पिकनिक आणि सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात. शाळेत पाळणाघराची उत्तम सोय आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी जोशी यांनी उत्तमरित्या केले .मुलांच्या नृत्याचे संचलन विराट व अमृता वाईरकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ पूजा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शाळेच्या शिक्षिका आभा जोशी , जान्हवी जोशी, पुनम डेरफळे, सपना पाटील ,श्रीदेवी दीदी ,अश्विनी दीदी ,धनश्री दीदी व सारिका दीदी यांनी स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कलांगण कथ्थक क्लास ,सौ प्रज्ञा शिंदे यांच्या विद्यार्थिनींनी सुद्धा आपली कला सादर केली.
हा संपूर्ण कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनी शाळेतील मनोहर वाढोकार सभागृहात पार पडला.
सर्व पालकांनी मुलांचे कौतुक करत हिरीरीने सहभाग घेऊन मुलांचे मनोधैर्य वाढविले व कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.