You are currently viewing वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने निषेध

वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने निषेध

*वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने निषेध*

पिंपरी

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दांपत्य गुरुवारी, दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत कळाले. सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून आज पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील वकील बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सदर वकील दांपत्याच्या हत्येचा तीव्र शब्दांत सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. देवराव ढाळे, ॲड. अशोक भटेवरा, ॲड. राजू माधवन, ॲड. किरण पवार, माजी उपाध्यक्ष ॲड. दत्ता झुळूक, ॲड. नवीन वालेचा, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सत्यन नायर, ॲड. सारिका परदेशी, पुणे लॉयर्स सोसायटीचे सचिव ॲड. अतिष लांडगे आदींनी निषेध व्यक्त केला. तर यावेळी ॲड. दिनकर लाळगे, ॲड. अनिल शेजवानी, ॲड. सूर्यकांत काळे, ॲड. अतुल कांबळे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. कृष्णा वाघमारे, ॲड. मंगेश नढे, ॲड. सोनाली गुंजाळ, ॲड. श्रद्धा मंचरकर, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. विकास शर्मा, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. भारत सलगर, ॲड. पूजा बदे, ॲड. शुभम खैरनार, ॲड. बालाजी देशमुख , ॲड. सागर अडागळे, ॲड. प्रकाश निनाळे, ॲड. स्वाती पावडे, ॲड. अजमा मुजावर, ॲड. अमोल सोनगीरे, ॲड. अंजली रणपिसे, ॲड. पूनम शर्मा, ॲड. सचिन पाटील, ॲड. अक्षय रसाळ, ॲड. विजय भगत, ॲड. रामजी रामगुडे, ॲड. रवी अगरवाल, ॲड. शिवम कुंभार आणि इतर वकील बांधव उपस्थित होते.
यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी वकील आढाव दांपत्याच्या झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली आणि सदर दांपत्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकदिवसीय कामकाज बंद ठेवण्याचे वकिलांना आवाहन करीत दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी आझाद मैदान येथे वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑल इंडिया लॉयर्स फेडरेशन यांच्यावतीने आयोजित आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पिंपरी – चिंचवड मधील वकील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वकील संरक्षण कायदा पारित करावा, सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्या वकिलांमार्फत
उपस्थित करण्यात आल्यात. सदर निषेध सभेचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड.अयाज शेख, ॲड. फारुक शेख, ॲड. अस्मिता पिंगळे आदींनी केले होते.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा