कणकवली –
तेली समाजाला संताजी, शिवाजी, पेशवाई सारख्या इतिहासाची परंपरा आहे. ३४० समाजामध्ये तेली समाजाचा समावेश आहे. आरक्षण टिकविण्यासाठी शासनाने प्रत्येक समाजाची जनगणना करून आरक्षण टिकण्यासाठी व आरक्षित नोकऱ्यांमध्ये आपला ओबीसीच्या जागा भरल्या जाव्यात यासाठी ओबीसी समाजाच्या लढवयाला बळ देऊन आमच्या जातनिहायतेची ताकद आहे तेवढेच सर्वेक्षण करून आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी आपण शासनाकडे नोंदवूया असे विचार महाराष्ट्र तैलीक समाज संघटनेचे महासचिव भूषण कर्डिले यांनी व्यक्त केले.
कणकवली येथील वृंदावन हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ स्नेह मेळावा, वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक सुरेश नेरुकर, महाराष्ट्र तैलीक समाज उन्नतीसंघटनेचे महासचिव भूषण कर्डीले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, व संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी जयेश बागडे, एकनाथ तेली, किशोर नाधवडेकर, रघुवीर शेलार, साधना बांदेकर, सतीश वैरागी, शिल्पा चिलेकर, तुकाराम तेली, आबा तेली, श्रेया महाडीक, प्रियांका भोपाळकर, तेली समाज संघटनेचे लक्ष्मण तेली, खजिनदार चंद्रकांत तेली, पं स सदस्य सुप्रिया वालावलकर, निलेश कामतेकर, दिनकर तेली, साई आंबेरकर आदींसह तेली समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव, तालुका अध्यक्ष, सिंधुदुर्ग सह रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, रायगड येथील समाज बांधव वधु आणि वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक परशुराम झगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना मालंडकर, प्रशांत आजगावकर यांनी केले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र तैलीक समाज संघटनेचे महासचिव भूषण कर्डिले म्हणाले, तेली समाज संघटना आणि समाज विखुरलेला आहे. तेली समाजामध्ये उद्योजक, कलाकार, विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेते या समाजाचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटित करण्याचे काम येथील समाज संघटनेने केले. आज तेली समाजामध्ये सर्वपक्षीय लोक कार्यरत आहेत. कोणत्याही पक्षाचा नेता राजकिय जोडे बाजुला ठेवून समाजातील कार्यक्रम न घेता तेली समाजाच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व्यक्तींना आणून समाजाचे कार्यक्रम घेतले जातात. तेली समाजाला धार्मिक जीवनात मोठे योगदान आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास, पेशवाईचा इतिहास, संताजी तुकाराम महाराजांचा इतिहास तसेच तुळजाभवानी सारख्या देवदेवतेच्या इतिहास आहे. तेली समाजाची ताकद ऐतिहासिक आहे. संताजी महाराजांची परंपरा या समाजाने राखली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाज संघटनेने प्रत्येक गावातील तेली समाज बांधव एकत्रित करून माणसे जोडण्याचे काम अधिक प्रमाणे केले पाहिजे. आज ओबीसी समाजात ३४० समाज एकत्रित आहेत. यामध्ये तेली समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजाच्या ५० टक्के आरक्षण, १९ टक्के आरक्षण ४०० सर्व जातींना दिले जाते. आज नोकरीमध्ये ही ओबीसी समाजाचे आरक्षीत जागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आज समाजाची ताकद दाखविणे गरजेचे झाले आहे. ओबीसी च्या लढ्यामध्ये समाज बांधवांनी संघटित झाले पाहिजे. गावागावातील जातं सर्वेक्षण करण्याची मागणी केली पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त केले.
तेली समाजामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चित्रकार किशोर नाधवडेकर सहअनेक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्ती आज आहेत. तेली समाजाला ऐतिहासिक वारसा आहे. समाज अधिक संघटित करण्यासाठी गावागावातील तेली समाज बांधवांनी तालुक्या – तालुक्यातून एकजूट दाखवा यातून जिल्ह्याची संघटना मजबूत करा. आपण संघटनेसाठी सदैव सहकार्य करू असेही ते म्हणाले.
यावेळी रत्नागिरी तेली समाज संघटनेचे रघुवीर शेलार, महाराष्ट्र प्रांतिक महासभा सहसचिव जयेश बागडे, कोकण तैलिक समाज संघटनेचे अध्यक्ष सतीश वैरागी, प्रांतिकचे गणेश धोत्रे, साधना बांदेकर आदींची समय सूचक भाषणे झाली.
समाज भूषण म्हणून सुरेश नेरकर, मधुकर बोडवेकर, एकनाथ तेली, बापू तळवडेकर, शैलेश डिचोलकर, आबा तेली, नंदकुमार आरोलकर लक्ष्मण तेली, चंद्रकांत तेली, प्रशांत वाडेकर, रमेश चव्हाण, दिलीप करमेळकर, शरद चव्हाण श्रेया महाडिक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जयेश बागडे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली आदीचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थाताचे आभार मानण्यात आले.